You are currently viewing पिंगुळी येथे गांजा विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटकेची कारवाई.

पिंगुळी येथे गांजा विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटकेची कारवाई.

कुडाळ /-

 

पिंगुळी येथे गांजा विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, सेवन करणाऱ्या इसमांची माहीती काढून त्यांचे विरुध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानूसार अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, यांचे मार्गदर्शनाखाली  जिल्हयात अंमली पदार्थ , गुटखा आणि दारु असे अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.पोलीस ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्ष अनिल जाधव, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास गाव मांडकुली येथे एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी घेवून येणार असल्याची माहिती मिळालेली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मांडकुली ब्रिजचे जवळ 2 व्यक्ती मोटार सायकलने येवून तेथे संशयास्पद हालचाली करताना दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्या व्यक्तींजवळ 30 हजार रुपये किंमतीचा गांजा सदृश्य पदार्थ मिळून आल्याने दोन्ही व्यक्तींना मोटार सायकलसह ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द कुडाळ पोलीस ठाणे गु.र.नं. 51/2022, गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(C) 20(B) IIA, 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
           
 या कारवाईत कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, महेंद्र घाग सहायक पोलीस निरीक्षक, सचिन शेळके पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अमंलदार सुधिर सावंत, अनिल धुरी, आशिष गंगावणे, प्रकाश कदम, प्रविण वालावलकर, चंद्रकांत पालकर, संकेत खाडये, अमित तेली, प्रथमेश गावडे, ज्ञानेश्वर कांदळगांवकर, यशवंत आरमारकर, रवि इंगळे, जयेश सरमळकर सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी सहभाग घेतला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ गुटखा आणि दारु व इतर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आलेली असून अशीच कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे. तरुण पिढी अशा अवैध मार्गाकडे वळून व्यसनाधिन होवू नयेत याकरिता सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून जनजागृती करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..