You are currently viewing उपलेखापाल श्री.राजेश रघुनाथ पेडणेकर सेवनिवृत्ती विशेष !

उपलेखापाल श्री.राजेश रघुनाथ पेडणेकर सेवनिवृत्ती विशेष !

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार विभाग कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथील उपलेखापाल या पदावर कार्यरत असलेले श्री.राजेश रघुनाथ पेडणेकर पद उपलेखापाल या पदावरून आज गुरुवार दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत.राजेश पेडणेकर यांचं मूळ गाव वेंगुर्ला तालुक्यातील उभादंडा आडारी आहे.राजेश पेडणेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.खर तर खरे आयुष्य सेवानिवृत्तीनंतर सुरू होते असे म्हणतात,..आता नाही घड्याळ आणि नाही कामाचा ताण सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य,आपण जगा एकदम झक्कास! सेवानिवृत्ती निमित्ताने आपणस शुभेच्छा.

श्री.राजेश रघुनाथ पेडणेकर हे नियत वयोमानानुसार आज ३१ मार्च २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग ओरोस येथून उपलेखापाल या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत.पेडणेकर यांच्या सेवेची सुरूवात २९ जुलै १९९१ रोजी जिल्हा कोषागार कार्यालय कुडाळ येथे झाली.त्यानंतर त्यांची उपलेखापाल या पदी महाराष्ट्र शासन मुंबई मंत्रालयात त्यांची प्रथम पदोन्नती मिळाली,तयानंतर काही वर्षांनी त्यांची मेरीटाईम बोर्ड वेंगुर्ला आणि उपकोषागार कार्यालय वेंगुर्ला येथे काही वर्षे उपकोषागार अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली,ही सेवा बजावत असताना श्री.राजेश पेडणेकर यांनी कर्मचारी क्रिडा स्पर्धांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.आपल्या ३० वर्षे ८ महिन्याच्या या सेवेत प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातही विशेष काम केले आहे.अश्या प्रकारे शासकीय सेवा सांभाळत सामाजिक ,क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या राजेश रघुनाथ पेडणेकर यांना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या पुढील जीवनात खूप,खूप,, शुभेच्छा!

अभिप्राय द्या..