वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे परबवाडा भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच भेंडमळा भागातही नुकसान झाले आहे.दरम्यान या भागातील झालेली भात शेती व इतर शेतीची नुकसानीची आज सभापती अनुश्री कांबळी यांनी पदाधिकारी यांच्यासह पाहणी केली.यावेळी गटविकास अधिकारी उमा पाटील,तालुका कृषी तथा मंडळ अधिकारी हर्षा गुंड, नायब तहसीलदार नागेश शिंदे,परबवाडा सरपंच पपू परब,उपसरपंच संजय मळगावकर,ग्रा.पं.सदस्य हेमंत गावडे, कृतिका साटेलकर,ग्लानेस फर्नांडिस, तलाठी सायली आंदुर्लकर,ग्रामसेवक संदीप गवस,उभादांडा ग्रामसेवक जाधव,खर्डे,ग्रा.प.सदस्य,कृषीचे सुपरवायझर आर.एम.केसरकर, कृषी सहाय्यक श्रद्धा वाडेकर आदी उपस्थित होते.