कुडाळ /-


कोकणाने राणे कुटुंबीयांना एवढं भरभरून दिलं आहे की माझे झालेले दोन पराभव त्यापुढे फार छोटे आहेत म्हणूनच पराभव होऊन सुद्धा घरी न बसता आपल्या लोकांसाठी काम करत राहणे हे मला योग्य वाटतं असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील रोजगार मेळाव्यात करून अशा प्रकारचे मेळावे या पुढे आयोजित केले जातील असे सांगितले. दरम्यान या मेळाव्या मध्ये १ हजार ७०० जणांनी नोंदणी केली तर ५४५ जणांना नोकऱ्या देण्यात आले आहेत.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ येथील नवीन एस. टी. बस आगाराच्या मैदानावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, माजी सभापती मोहन सावंत, राजन जाधव, माजी नगराध्यक्ष संजू परब, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, ओबीसी मोर्चाचे महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, शहर अध्यक्ष राकेश कांदे, नगरपंचायतीचे गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, निलेश परब, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, सखु आकेरकर तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या मेळाव्याच्या समारोप कार्यक्रम आहे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की, आम्ही राजकारण-समाजकारणामध्ये काम करतो त्यामुळे समाजाचे देणे आम्ही लागतो आणि त्याच भावनेतून अशा प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. होळी उत्सव असतानासुद्धा हजारो बेरोजगार रोजगारासाठी याठिकाणी आले हे सगळ्यात मोठं आहे जे कोणी आले नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अशा प्रकारचा मेळावा आयोजित करण्याचा आमचा संकल्प आहे. या कोकणाने राणे कुटुंबियांना भरभरून दिलं आहे. हे ऋण न फेटण्यासारखे आहे माझे दोन पराभव झाले पण कोकणाने दिलेल्या प्रेमापोटी हे पराभव शुल्लक आहेत आम्ही जनतेसाठी काम करत राहणार घरी बसणारे नाही. असे त्यांनी सांगून पुढचा काळ हा आमचाच असेल २०२४ मध्ये हे सगळं भाजपमय होईल असे त्यांनी सांगितले. यापूर्वी कोकणाला सहज मिळत होतं त्यावेळी त्या ठिकाणी भांडणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे होते आता मात्र कोकणाला काही मिळत नाही हे दुर्दैव आहे असे सांगून २०२४ नंतर पुन्हा नव्याने कोकण उभा करू त्यासाठी सर्वांची साथ लागणार आहे असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.

रोजगारासाठी तरुण-तरुणींची गर्दी

सकाळपासून या रोजगार मेळाव्यामध्ये तरुण-तरुणींची गर्दी झाली होती. या रोजगार मेळाव्यामध्ये आयोजकांनी केलेले नियोजनामुळे कोणताही त्रास नोकरी मिळवण्यासाठी आलेल्या तरुणांसाठी झाला नाही. सुलभ रित्या मुलाखती होत होत्या सुमारे १ हजार ७०० एवढ्या जणांनी रोजगारासाठी नोंदणी केली तर ५४५ जणांना तात्काळ नोकरी देण्यात आली. इतरांना जॉब कार्ड देण्यात आले. या माध्यमातून या तरुणांना वर्षभर माहिती दिली जाणार आहे.

नोकरी मिळाल्यावर आनंदाश्रू दरवळले

या रोजगार मेळाव्यामध्ये तात्काळ नोकर्‍या दिल्यामुळे अनेक तरुणांना आनंदाश्रू आवरले नाहीत पुणे, मुंबई तसेच काही कोकणातही नोकऱ्या देण्यात आल्या सुमारे ४० कंपन्या या ठिकाणी आल्या होत्या. या कंपन्यांनी नोक-या दिल्यामुळे सर्वांनी माजी खासदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले.

वाढदिवस झाला साजरा

वाढदिवसानिमित्त माजी खासदार निलेश राणे यांनी रोजगार मेळावा आयोजित केला होता आणि या रोजगार मिळालेला स्वतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपस्थित होते त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस मिळाला मध्ये साजरा करण्यात आला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध समाज घटकातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

फोटो:- रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करताना माजी खासदार नीलेश राणे सोबत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page