You are currently viewing हिंदुजनजागृती समितीच्या वतीने आदर्श होळी उत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न 

हिंदुजनजागृती समितीच्या वतीने आदर्श होळी उत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न 

कुडाळ /- 

होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण-उत्सव साजरे केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो. कोकणात होळी हा सण प्रत्येक गावात शहरात साजरा केला जातो . सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही गावामध्ये अपवाद वगळता सर्व ठिकाणी होळी मोठ्या उत्साहात साजरा झाला. 

हिंदूंचे धार्मिक सण – उत्सव  आदर्श रीत्या कसे साजरे करावेत या बाबत हिंदूंना प्रभोधन व्हावे यासाठी सनातन संस्था आणि हिंदुजनजागृती समिती यांनी संयुक्त रित्या जिल्ह्यात दोन ठिकाणी आदर्श होळीउत्सव  भावपूर्ण वातावरणात  साजरा केला. सावंतवाडी , कुडाळ, या ठिकाणी मोट्या संख्येने सनातन संस्थेचे साधक हिंदुजनजागृतीचे कार्यकर्ते असेच धर्माभिमानी हिंदु  उपस्तिथ होते . 

सावंतवाडी-  येथे  श्री देव नारायण मंदिर समोरील भागात होळीचे पूजन काण्यात आले , यावेळी  केसरी येथील  धर्मप्रेमी माजी पंचायत समिती सदस्य राघोजी  सावंत   यांनी पूजन  केले तर पुरोहित म्हणून श्रीपाद काशाळीकर यांनी विधिवत पूजा केली . या वेळी एकूण 

— हुन अधिक सनातनचे साधक, हिंदुजनजागृती समितीचे कार्यकर्ते, धर्माभिमानी हिंदु उपस्थित होते . 

कुडाळ- येथे कुडाळ – मालवण मार्ग  पोस्ट कार्यालयाच्या समोरील भागात होळीचे पूजन करण्यात आले, यावेळी धर्मप्रेमी श्री. विश्राम मर्गज यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले.

अभिप्राय द्या..