You are currently viewing १२ ते १५ वयोगटातील ३० हजार मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक कार्बोवॅक्स लस शाळा स्तरावर लसीकरण मोहीम.;सभापती डॉ.अनिशा दळवी यांची माहिती.

१२ ते १५ वयोगटातील ३० हजार मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक कार्बोवॅक्स लस शाळा स्तरावर लसीकरण मोहीम.;सभापती डॉ.अनिशा दळवी यांची माहिती.

सिधुदूर्ग /-

जिल्ह्यातील १२ ते १५ वयोगटातील ३० हजार मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक कार्बोवॅक्स लस दिली जाणार आहे.मंगळवारपासून शाळा स्तरावर ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी यांनी दिली.

सिधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक कार्यकाळ २० मार्च रोजी संपुष्टात येत आहे, दरम्यान या पंचवार्षिक कालावधी आपल्याला दोन वेळा शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदाची संधी प्राप्त झाली या पार्श्वभूमीवर डा. अनिषा दळवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना डॉ. दळवी म्हणाल्या गेल्या ५ वर्षांमध्ये आपल्याला दोन वेळा शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदाची संधी प्राप्त झाली, जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आणि शैक्षणिक दृष्ट्या विविध उपक्रम राबवून विविध विकास योजना राबविण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. आपणा सर्वांच्या सहकार्याने मिळालेल्या संधीचे माध्यमातून आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक तसेच आरोग्याच्या विविध योजना राबविण्यासाठी आपण काम केले, शैक्षणिक दृष्ट्या अनेक उपक्रम राबविले. कोराना महामारी च्या वेळी लसीकरण ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील राहिले.जनतेचे आरोग्यासाठी कोराणाच्या विविध उपाय योजना राबविणे याकडे लक्ष देण्यात आले आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांपासून१८ ते ४५ वयोगटातील व्यक्ती पर्यंत लसीकरण मोहीम राबविण्यात आले होते आताचा टप्प्यात १२ ते १५ वयोगटातील मुलांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी 30हजार लस उपलब्ध झाली असून उद्या मंगळवारपासून शाळामध्ये विद्यार्थ्यांनाही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे ,संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याला लस देण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे असे आवाहन डॉ. दळवी यांनी करत गेल्या पाच वर्षात मिळालेल्या संधीचे आपण जनतेच्या विकासासाठी पुरेपूर फायदा करून देण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रिय मंत्री नारायण राव राणे साहेब,आमदार नीतेश जी राणे साहेब ह्यांनी हया पदावर काम करण्याची संधी दीली हया बद्दल त्यांचे खूप आभार व्यक्त केले. हया पुढे देखील समाजकारण मध्ये राहून जिल्ह्याचा विकासा मध्ये खारीचा वाटा उचलण्यास कटिबध्द राहण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

प्रतिक्रिया व्यक्त करा