You are currently viewing मनसेच्या कुडाळ मधील तालुकाध्यक्ष पदाबाबत मिडीयातुनच वाचनात आले..कोणत्याही पातळीवरील बैठकी बाबत अनभिज्ञ…

मनसेच्या कुडाळ मधील तालुकाध्यक्ष पदाबाबत मिडीयातुनच वाचनात आले..कोणत्याही पातळीवरील बैठकी बाबत अनभिज्ञ…

१५ मुद्यावर आधारित उत्तर लेखी स्वरुपात वरिष्ठाकडुन प्राप्त झाल्यावर निर्णय शक्य तो पर्यंत प्रभारी सचिन सावंत काम करतील.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब.

कुडाळ /-

गेली सोळावर्षे पक्षाचे काम करत असताना कधीही पक्षशिस्त भंग केला नाही.पक्षाचे नाव खाली जाईल असे वर्तन केले नाही.पक्षाच्या शिस्ती प्रमाणे जिल्हाध्यक्ष म्हणुन 15 कारणांचा अहवाल वरीष्ठ नेते मंडळींना दिला, चुकीचे असल्यास लेखी अभिप्राय देण्याची विनंती केली.पैकी एकांनेही आज पर्यत मला अभिप्राय दिला नाही.कोणताही संवाद नाही.नियुक्ती पत्रा पासुन कारवाई पर्यत सर्व गोष्टी लेखी स्वरुपात दिल्या आहेत.

या बाबत मिडीयातुन कोणाचेही उत्तर अपेक्षीत नसुन माझ्या पत्राला व उपस्थीत केलेल्या मुद्दयानां उत्तर अपेक्षीत आहे.मी पक्षशिस्ती प्रमाणे पत्र व्यवहार केला.मिडीयातुन 15 कारणे विचारली नाही.माझ्या अहवाल विषयी चुकीचे वाटल्यास उत्तर दयावे.की आपण उपस्थीत केलेली 15 कारणे चुकीची आहेत,तत्थ हीन आहेत,अनाआवश्यक आहेत.मी मान्य करुन कारवाई मागे घेईन.तस मी लिहुन देखील दिलेल आहे.

परंतु पक्षा अंतर्गत विषय मिडीयातुन समजणे अयोग्य आहे.राज साहेबांच्या आदेश पद गोठवणे /काढुन टाकणे विषयी योग्यच आहे.परंतु कोणालाही काढुन टाकले नाही तर वरिष्ठ अभिप्राय येई पर्यत अधिकार वजा केल्याची कारवाई होती.या सर्वावर वरिष्ठ अभिप्राय देई पर्यत प्रभारी व्यक्ती जबाबदारी स्वीकारतील अशी होती.या सर्वा मुळे मी सर्व नेत्यांना दिलेल्या 15 मुद्याच्या कारणां विषयी लेखी उत्तर /प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत आहे. त्यांची उत्तर अभिप्राय मिळताच कारवाई आणि नियुक्ती विषयी मी पुन्हा दोघांना पत्र देईन.वरिष्ठांना याबाबत माहीती कळविण.मिडीयाला माहीती देईन.असे मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा