सिंधुदुर्ग /-
लोकनेता माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते विशाल परब यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लक्षवेधी बॅनरबाजी करून संपूर्ण जिल्हात वातावरण एक चैतन्यमय करून सोडले आहे.या युवा लोकनेत्याच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते विशाल परब आणि विशाल परब मित्र मंडळ व भारतीय जनता पार्टी कुडाळ यांच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून,यासाठी विशाल परब यांनी कुडाळ मध्ये जोरदार तयारी सुरू करत, ठिकठिकाणी बॅनर लावून संपूर्ण जिल्हा हायजॅक केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र झळकत असणाऱ्या लक्षवेधी बॅनर मुळे संपूर्ण जिल्ह्यात विशाल परब यांच्याच नावाची जोरदार चर्चा सुरू असून निलेश राणे यांचा भव्यदिव्य वाढदिवस कुडाळ येथे विशाल परब मित्र मंडळ व भाजपच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.