You are currently viewing आडेली शाळा नं. १ चा स्काऊट निसर्ग निवास शिबिर एक विशेष उपक्रम

आडेली शाळा नं. १ चा स्काऊट निसर्ग निवास शिबिर एक विशेष उपक्रम

वेंगुर्ला /-

      वेंगुर्ले तालुक्यातील आडेली शाळा नं. १ तर्फे स्काऊट निसर्ग निवास शिबिर एक विशेष उपक्रम राबविण्यात आला.वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आडेली नं. १ च्या वतीने २ दिवशीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये या प्रशालेचे भगतसिंग स्काऊट पथकाचे २२ स्काऊटर विद्यार्थ्यी व शाळा आडेली भंडारवाडी चे ११ कब असे एकूण ३३ विद्यार्थ्यी तसेच  आडेली शाळा नं.१ चे शिक्षक तथा स्काऊट मास्तर सिताराम लांबर व आडेली भंडारवाडी शाळेचे शिक्षक तथा कब मास्तर बापू धुरी  हे सहभागी झाले होते.

     शिबिर हा स्काऊट शिक्षणातील अत्यंत महत्त्वाचा व मुलांना आवडणारा भाग आहे.आरोग्य, स्वावलंबन,आत्मविश्वास, अनेक कौशल्ये व चातुर्ये या गोष्टी मुलांना बालवयात शिकण्याची ही एक अपूर्व संधी असते. स्काऊटींग मध्ये शाळेबाहेरील जीवनास विशेष महत्त्व असते. यातील शिबिर कालावधी हा स्काऊट अभ्यासक्रमाचा गाभा समजला जातो. कारण आपण जे शिकलेलो असतो त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेता येते. तसेच शैक्षणिक गुणवत्तेत शालेय मूल्यमापनात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशाच प्रकारे या उपक्रमात  सहभागी झाले होते. या दोन दिवशीय निवाशी शिबिरांमध्ये स्काऊटर्सना स्वच्छता करणे,तंबू उभारणे,विविध गॅझेट तयार करणे,ध्वजारोहण,शेकोटी कार्यक्रम ,विविध हावभावयुक्त गाणी, व्यायाम, रामधून,सर्वधर्मप्रार्थना,नकाशा तयार करणे, यासोबत गाठीच्या स्पर्धा, चित्रकला, तंबू सजावट आदी स्पर्धा नियोजन पूर्वक घेण्यात आल्या. त्याचबरोबर स्वतःची वैयक्तिक स्वच्छता, सहकार्यभावना,नेतृत्वगुण, अंदाज,तर्कज्ञान आदीविषयी प्रात्यक्षिके घेण्यात आली. विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ,शिक्षणप्रेमी व स्काऊट लिडर सिताराम लांबर यांचे उत्कृष्ट नियोजन व कब मास्तर बापू धुरी यांचे उत्तम सहकार्य यामुळे हे शिबीर यशस्वीपणे पार पडले.या दोन दिवशीय निवासी शिबिरांस जिल्हा स्काऊट गाईड संघटक शुभांगी तेंडोलकर ,श्री सोमेश्वर कलामंच आडेली चे कलाकार मंदार धर्णे, कांचन धर्णे  व सहकारी, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी,शिक्षण विस्तार अधिकारी वंदना परब,आडेली शाळा नं. १  चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव परब, केंद्रप्रमुख महादेव आव्हाड,मुख्याध्यापक संजय गोसावी, शिक्षणप्रेमी राजू सामंत, कबमास्तर  सुभाष साबळे  व ग्रामस्थ यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या व शिबीर आयोजनाबद्दल सिताराम लांबर व बापू धुरी यांचे अभिनंदन केले. तसेच इतर शाळांसाठी प्रेरणादायी असा उपक्रम असल्याचे गौरवोद्गार व्यक्त केला. हे निसर्ग निवास शिबिर आयोजन करण्यात आत्माराम धर्णे, विनायक धर्णे, राजू सामंत, महादेव परब, संजना धर्णे, आरती कोंडसकर,सदानंद धर्णे आडेली शाळा नं. १ शाळेचे मुख्याध्यापक संजय गोसावी सर व सहकारी शिक्षक यांचे उत्तम सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा