You are currently viewing वेंगुर्ले आगारातून “वेंगुर्ले – सातार्डा – पणजी” ही बससेवा सुरु ; भाजपच्या मागणीला यश

वेंगुर्ले आगारातून “वेंगुर्ले – सातार्डा – पणजी” ही बससेवा सुरु ; भाजपच्या मागणीला यश

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले आगारातून आज सोमवार १४ मार्च २०२२ पासून वेंगुर्ले – सातार्डा – पणजी ही बससेवा सुरू झाली आहे.दरम्यान काल रविवारी वेंगुर्ले भाजपच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.याबाबत संबंधित विभागाने त्वरित दखल घेत बसफेरी सुरु केल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.वेंगुर्ले एस.टी. आगारातून पणजी,सावंतवाडी, कणकवली मार्गावर बसफेऱ्या सुरु झाल्या आहेत.तर कुडाळ,मालवण आगारातून वेंगुर्ले मार्गावर बसफेऱ्या सुरु आहेत.बेळगाव वेंगुर्ले व वेंगुर्ले बेळगाव ही एक बसफेरी सुरु आहे.वेंगुर्ले आगारातून आज सोमवार १४ मार्चपासून सकाळी ६.३० वा. वेंगुर्ले -सातार्डा – पणजी, सकाळी ९ वाजता पणजी – सातार्डामार्गे
वेंगुर्ले, दुपारी २.४५ वाजता वेंगुर्ले – सातार्डामार्गे – पणजी, सायंकाळी ५.१५ वाजता पणजी – सातार्डामार्गे – वेंगुर्ले अशी बससेवा सुरू झाली आहे. वेंगुर्ले आगारातून सावंतवाडी या मार्गावर शुक्रवार ११ मार्च पासून बस फेरीसुरू झाली आहे.सकाळी ८ वा. वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी, सावंतवाडी तुळस वेंगुर्ले सकाळी ९.१० वाजता, दुपारी १२.३० वाजता वेंगुर्ले तुळस सावंतवाडी, दुपारी २ वाजता सावंतवाडी मठमार्गे वेंगुर्ले, सायंकाळी ५ वाजता वेंगुर्ले तुळस सावंतवाडी,सायंकाळी ६.१५ वाजता सावंतवाडी तुळसमार्गे वेंगुर्ले अशा तीन बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत.वेंगुर्ले आगारातून कणकवली मार्गावर शनिवार १२ मार्चपासून बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. यामध्ये वेंगुर्ले मठमार्गे कणकवली सकाळी ८ वाजता, सकाळी १० वाजता कणकवली मठमार्गे वेंगुर्ले, दुपारी २ वाजता वेंगुर्ले मठमार्गे कणकवली, सायंकाळी ५.३० वाजता कणकवली मठमार्गे वेंगुर्ले अशी बससेवा सुरू झाली आहे. तसेच कुडाळ आगारातून सकाळी १० वाजता कुडाळ मठमार्गे वेंगुर्ले, सकाळी ११.१५ वाजता वेंगुर्ले मठमार्गे कुडाळ, सायंकाळी ४ वाजता कुडाळ मठमार्गे वेंगुर्ले, सायंकाळी ५.१५ वाजता वेंगुर्ले मठमार्गे कुडाळ अशा बसफेऱ्या मागील काही दिवसांपासून सुरू आहेत.तसेच मालवण आगारातून सकाळी ८ वाजता मालवण देवली म्हापणमार्गे वेंगुर्ले, सकाळी १० वाजता वेंगुर्ले म्हापण देवलीमार्गे मालवण, दुपारी २ वाजता मालवण देवली म्हापणमार्गे वेंगुर्ले व सायंकाळी ४ वाजता वेंगुर्ले म्हापण देवलीमार्गे मालवण अशा बससेवा सुरू झाल्या आहेत. तसेच बेळगाव वेंगुर्ले व दुपारी १२.३० वाजता वेंगुर्ले बेळगाव ही बसफेरी सुरु आहे.वेंगुर्ले आगाराचे मध्ये २ वाहक हजर झाले असून व ४ चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेले आहेत.१२ कार्यशाळा कर्मचारी व ११ प्रशासकीय कर्मचारी हजर झाले आहेत.कुडाळ आगाराचे २ वाहक कामगिरीवर कार्यरत आहेत.जसे चालक, वाहक हजर होतील तसे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात बसफेर्‍या सुरू करण्यात येतील, अशी माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक विशाल शेवाळे व स्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी दिली. प्रवाशांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले बसस्थानकातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान या बस फेऱ्या सुरू झाल्याने सर्वसामान्य जनतेला निश्चितच दिलासा मिळाला आहे.

अभिप्राय द्या..