You are currently viewing वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या मोफत महा आरोग्य तपासणी शिबिर

वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या मोफत महा आरोग्य तपासणी शिबिर

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक १५ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुका शिवसेना, अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर, ओझोन मेडिकेअर सर्व्हिसेस व जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने हे महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये हृदयरोग, किडनी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी, मेंदू व मणका विकार, जनरल तपासणी, महिलांशी संबंधित सर्व आजार आदी लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी डॉ. राहुल चौगुले, डॉ. ओमकार दळवी, डॉ. स्वप्नाली पवार, डॉ.गृहिता राव आदी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. यावेळी ई.सी.जी., रक्तातील साखर तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब व शहरप्रमुख अजित राऊळ यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..