You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही पंचायत समितीवर प्रशासक लागू.;अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी असे दीले आदेश..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही पंचायत समितीवर प्रशासक लागू.;अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी असे दीले आदेश..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत समिती यांचा कार्यकाल हा मार्च पहिन्यात संपत्त असून ,या पुढील पंचायत समिती निवडणुका होईपर्यंत या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांवर प्रशासक , लागू करण्यात आला आहे.पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत निवडून आलेले सदस्य आणि सभापती,उपसभापती पदाची आज मुद्दत मुदत संपली आहे.त्यामुळे या पंचायत समित्यांवर गटविकास अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियूक्ती करण्यात आली आहे.राज्यात कार्यकाळ समाप्त झालेल्या अनेक पंचायत समितीवर असे प्रशासक नेमले आहे.अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी तसे आदेश दिले आहेत.सिंधुदुर्ग जिल्हात दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी अशा आठही पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्त केला आहे.कार्यकरणी निवडणूक लागून पदाधिकारी निवडे पर्यत हा कालावधी राहणार आहे.

अभिप्राय द्या..