You are currently viewing हस्ताक्षर स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वजराट- देवसू नं. २ शाळेचे घवघवीत यश.

हस्ताक्षर स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वजराट- देवसू नं. २ शाळेचे घवघवीत यश.

सिंधुदुर्ग /-

तळेरे येथील ‘अक्षरोत्सव’ परिवार, श्रावणी कॉम्प्युटर्स तळेरे आणि मेधांश कॉम्प्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वजराट- देवसू नं. २ ने घवघवीत यश संपादन केले. ही स्पर्धा तीन गटात झाली होती. त्यात ३८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यात इयत्ता १ ली ते ४ थी या गटात पल्लवी रामचंद्र गोवेकर हिने तिसरा क्रमांक मिळविला तर संचिता गजानन वेंगुर्लेकर, भगवान समीर विटेकर, वैशाली रामचंद्र गोवेकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. विजेत्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या मुलांना मुख्याध्यापक माधुरी पराडे तर सहाय्यक शिक्षिका सुनिता पाटील यांनी मार्गदर्शन केले. या सर्वांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण पडते, उपाध्यक्ष रसिका वेंगुर्लेकर व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..