You are currently viewing बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराचे पिंगुळी येथे उद्घाटन.

बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराचे पिंगुळी येथे उद्घाटन.

एन एस एस शिबीर सामाजिक बांधिलकीची नांदी ठरावी*: निर्मला पालकर.

कुडाळ /-

” राष्ट्रीय सेवा योजना विभागात काम करण्याची सवय सामाजिकतेचे भान देते. ती सामाजिक बांधिलकीची नांदी ठरावी .त्यासाठी निवासी एस एस शिबीर हे व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे “.असे उद्गार पिंगळी गावच्या सरपंच सौ .निर्मला पालकर यांनी काढले .त्या पिंगुळी येथे बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या निवासी संस्कार शिबिराचे उद्घाटन करताना बोलत होत्या. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “एन एस एस शिबिरातून सामाजिक समायोजन संबंध प्रस्थापित करणे ही गोष्ट साध्य होते. सामाजिक वसा जोपासला जातो. नेतृत्व विकास होतो. संज्ञापन या कौशल्यांचा विकास होतो.अशी शिबीरं घराच्या चौकटीतून बाहेर पडून समाजात मिसळण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे .त्याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनाच्या विविध क्षेत्रात उपयोग होऊ शकतो”. असे सांगत एस एस घेतलेल्या व निवासी शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले.व शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर पिंगळी ग्रामपंचायत सदस्य प्रिया पांचाळ, दिव्या गावडे, शिवदास मसगे, बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, प्रा.वैशाली ओटवणेकर, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे ,ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर, प्रा नितीन बांबर्डेकर ,कार्यक्रमाधिकारी प्राची बर्वे , शामल कुंभार उपस्थित होत्या.

दीपप्रज्ज्वलन करून व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना कल्पना भंडारी, परेश धावडे ,अरुण मर्गज ,शिवदास मसगे, यांनी “आयुष्याच्या संचिता मध्ये एनएसएस कॅम्प नक्कीच चिरस्मरणीय ठरणार .कारण सामाजिक बांधिलकीची व समाज सेवेच्या उपक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत केलेली असते .हा जो समाजसेवेचा वसा आहे तो विद्यार्थ्यांना भविष्यात सामाजिकतेचे नक्कीच भान देणारा ठरणार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्व मध्ये नक्कीच भर घालणारा ठरणार आहे. आपण एका वेगळ्या अनुभवाची शिदोरी या शिबिरातून घेऊन जाणार आहात त्याचा तुमच्या आयुष्याच्या वाटचालीत नक्कीच उपयोग होईल “.असे सांगत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सदर शिबीरामध्ये स्वच्छता, जलव्यवस्थापन, मानसिक आरोग्य ,व्यक्तिमत्व विकास, व्यसनांच्या विळख्यात अडकलेली तरुणाई या या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींच्या बौद्धिक समुपदेशनाबरोबरच वनराई बंधारे .रस्ते सफाई. आरोग्याचे महत्व, आरोग्य तपासणी शिबिरे इत्यादींचे आयोजन केले जाणार आहे. याशिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शामल कुंभार तर प्रास्ताविकामध्ये प्राची बर्वे यांनी शिबिरार्थींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची, व शिबिरातील जबाबदारीची माहिती करून दिली. व शिबिराच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा