You are currently viewing नागरिकांसाठी परिपूर्ण आरोग्य सुविधाना प्राधान्य.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’च्या शिष्टमंडळाला आश्वासन.

नागरिकांसाठी परिपूर्ण आरोग्य सुविधाना प्राधान्य.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’च्या शिष्टमंडळाला आश्वासन.

सिंधुदुर्गनगरी /-

नागरिकांना परिपूर्ण आरोग्य सुविधा देण्याचा विषय सर्वोच्च प्राधान्यक्रमाने घेतला जाईल. कंत्राटी भरती, औषध पुरवठा, रुग्णवाहिकांची उपलब्धता, विविध योजनांची प्रसिद्धी याचा नियमित आढावा घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ‘सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’च्या शिष्टमंडळाला दिले.

‘सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’च्या शिष्टमंडळासोबत श्रीमती मंजुलक्ष्मी यांनी सविस्तर बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला ‘मिशन’तर्फे आधार फाऊंडेशनचे नंदन वेंगुर्लेकर, ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लबचे सचिव डॉ. सुहास पावसकर उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिफे या बैठकीला उपस्थित होते. आरोग्य सेवेप्रती सजग असलेल्या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांनी निर्माण केलेल्या सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन या अराजकीय व्यासपीठाने जिल्हाधिकारी यांना केलेल्या विनंतीवरुन ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला जिल्हाधिकारी व उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, कुटिर रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे अशा सर्वच ठिकाणी विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि निमवैद्यकीय पदे, तंत्रज्ञांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यामुळे नागरिकांना पायाभुत सुविधा असुनही आरोग्यविषयक सेवा उपलब्ध होत नाही. परिणामी आलेला रुग्ण पुढे संदर्भित केला जातो, याकडे लक्ष वेधण्यात आले. पदभरती हा जरी राज्यस्तरावरचा प्रश्न असला तरी कंत्राटी पद्धतीने जागा भरण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषज्ञांसाठी…

प्रतिक्रिया व्यक्त करा