You are currently viewing अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आम जनतेला दिलासादायक.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत.

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आम जनतेला दिलासादायक.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत.

सिंधुदुर्ग /-

 राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज महाराष्ट्र विधीमंडळात अर्थ संकल्प सादर केला,हा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला दिलासा दायक असून, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा आजच्या अर्थसंकल्पात प्रयत्न केला आहे,विशेष करून ओबीसी समाजाला भरीव आर्थिक तरतूद करताना तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे,कोरोना कालावधीत सर्व स्तरातील जनतेला दोन वर्षे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते,त्याची झळ कमी होऊन दिलासा मिळावा,तसेच त्यांची आर्थिक घडी बसावी यांचा आजच्या अर्थसंकल्पात प्राधान्याने अर्थमंत्री ना, अजितदादा पवार यांनी विचार करून पर्यटन, व्यापारी वर्ग बाजारपेठ विकासासाठी सिंधुदुर्गातील किल्ल्याच्या संवर्धना बरोबरच पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे,तसेच सीएनजी वरील दहा टक्के कर कमी करून दिलासा देण्याचा केलेला प्रयत्न उल्लेखनीय असून आजच्या या अर्थ संकल्पाचे महाराष्ट्रातील जनतेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे

अभिप्राय द्या..