सावंतवाडी /-
सावंतवाडी : सावंतवाडी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने, महिला दिनाचं औचित्य साधून, खास महिलांकरिता ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाजपा महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम सावंतवाडीत सर्वप्रथम होत आहे. रविवार १३ मार्चला सायंकाळी ४ ते ७ या वेळेत राणी पार्वती हायस्कूलच्या पटांगणावर होणार आहे.आज साऱ्या घराची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर उचलणाऱ्या महिलांना सुद्धा एक विरंगुळा निर्माण व्हावा तसेच त्यांच्यातील कला-गुणांना वाव भेटावा या उद्देशाने “खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाच आयोजन मोहिनी मडगावकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल आहे.
या कार्यक्रमामार्फत खास पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. तसचं दुसऱ्या विजेत्या महिलेला खण साडी आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या महिलेला खास आर्ट सिल्क साडी भेट मिळणार आहे. त्याचबरोबर मनोरंजनाच्या अनेक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे. या कार्यक्रमाला भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ‘घे भरारी’ फाऊंंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मोहिनी मडगावकर सामाजिक क्षेत्रात भरीव काम करत आहेत. सामाजिक कामासोबतच राजकीय कामातही त्या अग्रेसर आहेत.
तरी जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन असं आवाहन मोहिनी मडगावकर यांनी केलं आहे. तसेच अधिक माहितीसाठी मोहिनी मडगावकर 9423220138, मेघना साळगावकर – 9420136546 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.