You are currently viewing माजी सरपंच प्रसाद पोईपकर यांच्या नेतृत्वाखाली वाघोसेवाडीमार्गे हुमरमाळा रस्त्याच्या कुडाळ प.स.सभापतींना निवेदन !

माजी सरपंच प्रसाद पोईपकर यांच्या नेतृत्वाखाली वाघोसेवाडीमार्गे हुमरमाळा रस्त्याच्या कुडाळ प.स.सभापतींना निवेदन !

कुडाळ /-

आज माजी सरपंच तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्री. प्रसाद पोईपकर यांच्या नेतृत्वाखाली वाघोसेवाडीमार्गे हुमरमाळा रस्त्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.येत्या आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास भोगटे यांच्या घरासमोरील रस्त्यावर बसून आंदोलन छेडण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला.गटविकास अधिकारी श्री. विजयजी चव्हाण, श्री. राजेंद्र कुलांगे,उपअभियंता बांधकाम विभाग, श्री. लोकरे,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि सभापती सौ.आईर यांना निवेदन देण्यात आली.यावेळी श्रीम.पुष्पा नेरुरकर,माजी जिप सदस्या,निकेत श्रुगांरे, प्रसाद परब,संतोष खवणेकर,शैलेश परब,लक्षण परब,अमोल नांदोसकर,महेश परब व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.सोमवारी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून योग्य तो निर्णय घेण्याचे वचन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

अभिप्राय द्या..