कणकवली /

*कणकवली लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे संविधान संवादशाळा घेण्यात आली. मुलांशी संविधान ह्या विषयावर संवाद साधण्यात आला. संविधान म्हणजे काय? संविधानाची का गरज आहे? हे सर्व सांगणारी प्रस्ताविका या प्रस्ताविकेवर व त्यातील मूल्यांवर तसेच लोकशाही असूद्यात की धर्मनिरपेक्षता या महत्वाच्या मूल्यांवर विद्यार्थी व विद्यार्थीनींशी आणि शिक्षकांशी संवाद सत्र संविधान संवादक सुजय स्वप्नाली सत्यवान यांनी घेतले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ऍड. स्वाती तेली याही उपस्थित होत्या. तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतिश कामत, सावित्रीबाई फुले महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. राधिका सावंत, डॉ. राज ताडेराव, संतोष रायबोले, सहकारी शिक्षक प्रमोदसिंह पाटील आदी उपस्थित होते.

केंद्राच्या वतीने सावित्री वदते ही पुस्तिका भेट देताना….संवादक सुजय स्वप्नाली सत्यवान व विद्यार्थीनी आणि शिक्षिकेतर कर्मचारी

ह्या संवादशाळेसाठी केंद्राचे संवादक सुनिल स्वामी, राजवैभव शोभा रामचंद्र, हर्षल जाधव, रेश्मा खाडे, शितल यशोधरा, तुषार चोपडे, शर्मिला जोशी, रुपेश वानखेडे, प्रमोद गायधनी, मिनाक्षी खतगावकर, अमोल कदम, सुमित प्रतिभा संजय, महेश बिराजदार, नीलेश साबळे, दिपाली कांबळे, मुक्ता निशांत, अमर पवार, गायत्री आडे, जावेद शहा व सर्व संविधान संवादक टिम यांचे मार्गदर्शन लाभले. अजून बऱ्याच शाळा कॉलेजमध्ये, गाव, तालुका जिल्ह्यामध्ये संवादशाळा आणि कार्यशाळा घेण्याची ईच्छा आयोजकांनी व्यक्त केली. आपल्या येथे संविधान संवादशाळा घेण्यासाठी सुजय स्वप्नाली सत्यवान – ७७९६१८३८७९/९३०७१३०६११ यांच्याशी संपर्क करण्याचे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page