You are currently viewing गोवा, यू पी मध्ये म्याव म्याव चा आवाज आला नाही.;आमदार नितेश राणेंनी पुन्हा ठाकरेंना डिवचले..

गोवा, यू पी मध्ये म्याव म्याव चा आवाज आला नाही.;आमदार नितेश राणेंनी पुन्हा ठाकरेंना डिवचले..

सिंधुदुर्ग /-

विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणेंनी म्याव म्याव आवाज काढत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्या नंतर घडलेलं महाभारत संपूर्ण राज्याने अनुभवलं. ही घटना अद्यापही ताजी असतानाच आमदार निते राणेंनी नाव न घेता आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं आहे.

गोवा आणि उत्तर प्रदेश येथील निवडणूकीचे निकाल हाती येत आहेत. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत राज्याचे पर्यावरणमंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर नितेश राणेंनी ट्विट केलं आहे. “गोवा और युपीमे म्याव म्यावकी आवाज नहीं सुनाई दी भाई व्हेरी सॅड… बहुत दुख हुवा’ असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

अभिप्राय द्या..