सीईटी प्रवेश परीक्षा तारखा जाहीर..

सीईटी प्रवेश परीक्षा तारखा जाहीर..

मुंबई /-

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार विधी 5 वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 11 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. तसेच एमपीएड-एमएड, बीएड-एमएड, बीपीएड, बीए-बीएससी बीएड इंटिग्रेटेड या परीक्षेच्या तारखाही सीईटी सेलने जाहीर केल्या आहेत. मात्र एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने अनेक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा लांबणीवर गेल्या. उच्च शिक्षण विभागाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. त्यानुसार एएलबी 5 वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा 11 ऑक्टोबरला घेण्यात येईल. तर एमपीएड-एमएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 3 ऑक्टोबर, बीएड-एमएड 10 ऑक्टोबर, बीपीएड 11, बीए-बीएससी बीएड इंटिग्रेटेड 11 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे.राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा अद्याप झाल्या नसल्याने या एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. येत्या काही दिवसात या अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या..