कोल्हापूर /-

जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले “एॅटलास माॅथ” शिराळा तालुक्यातील (जिल्हा. सांगली ) येथे कोकरूङ येथील जलसंपदा वसाहतीत सापङले . येथील उपविभाग क्रमांक 1 कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर हे पतंग (फुलपाखरू) काही काळ विसावले होते.

वसाहतीमधील कार्यालय प्रमुख श्री.लांडगे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी कुतूहलाने त्याचे फोटोही काढले.नंतर वसाहतीमधील कु. मिनाजुल सरदार मुजावर हिने गुगल वर या प्रजातीबद्दल माहिती शोधली असता ते दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले “एॅटलास माॅथ” आहे हे समजले.

जगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये “एॅटलस माॅथ” गणती होते. त्याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला “एॅटलास माॅथ” म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट (आळी) असतांनाच भरपूर खाऊन घेतलेले असते. या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसाचे असल्याने या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारसा मागे ठेवून हे पतंग मरतात. अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेला हा दुर्मिळ जिव शक्यतो दक्षिण-पूर्व आशियात आढळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page