नेर्लेतील वृध्दास कु-हाडीने मारहाण; एकावर गुन्हा दाखल

नेर्लेतील वृध्दास कु-हाडीने मारहाण; एकावर गुन्हा दाखल

कोल्हापूर /-

नेर्ले ता. शाहूवाडी येथील गुंगा बाळू पाटील वय ६९ यांना भावकीतील प्रकरणात पुढाकार घेत असल्याच्या कारणावरून शिवीगाळ व कु-हाडीने डोक्यावर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मारूती बंडू घोडे यांच्या विरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, गुंगा पाटील व मारूती घोडे यांच्यात मुबंईतील सामाईक खोली व शेतीच्या वाटणी वरून पुर्वीपासून वाद सुरू आहे. गुंगा पाटील यांनी साताळपठारावरील झाडेची कडतारी येथे जनावरे चारण्यासाठी नेली असता. सागवानच्या झाडाखाली विश्रांती घेत असताना भावकीतील मारूती घोडे हा तेथे आला. आमच्या भावकीतील प्रकरणात पुढाकार कक्षेत असल्याच्या कारणावरून चिडून मारुतीने गुंगा पाटील यांना तुला आता जिवंत ठेवत नाही.तुला वाचवायला कोणी येणार नाही. अशी धमकी देऊन हातातील कु-हाडीच्या दांड्यांने डाव्या पायावर मारहाण केली. त्यानंतर कु-हाडीने डोक्याच्या उजव्या भागात मारहाण जखमी केले. दरम्यान आरडाओरडा करून नातू प्रथमेश याला हाक मारून बोलावून घेतले असता आरोपी पळून गेला. प्रथमेशने जवळच खेळत असलेल्या मुलांना बोलावून घेतले. जखमी गुंगा पाटील यांना प्राथमिक उपचारासाठी भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. तेथून सिटी स्कनिंगसाठी कोल्हापूरातील खासगी हॉस्पिटल मध्ये नेऊन स्कनिंग करण्यात आले. याप्रकरणी मारुती घोडे यांच्या विरोधात गुंगा पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.अधिक तपास मा.पो.नि.सो यांचे आदेशानुसार पो.हे.कॉ. ए. आर. बांबळे करित आहेत.

अभिप्राय द्या..