You are currently viewing जि.प.च्या वॉटर प्युरीफायर घोटाळ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी.;राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाची एसपी आणि जि. प. सीईओं कडे मागणी.

जि.प.च्या वॉटर प्युरीफायर घोटाळ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी.;राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाची एसपी आणि जि. प. सीईओं कडे मागणी.

सिंधुदुर्ग /-

वॉटर प्युरीफायर प्रकरणाची तपासणी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना २ कोटी रुपये खर्च करून वॉटर प्युरीफायर वितरित केले आहेत. यात ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्याप्रमाणे चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांची भेट घेतली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचीही भेट घेतली.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, प्रांतिक सदस्य काका कुडाळकर, बाळ कनयाळकर, शिवाजी घोगळे, भास्कर परब, समीर आचरेकर, रवींद्र पिळणकर आदी उपस्थित होते. वॉटर प्युरीफायर घोटाळा प्रकरणी चौकशी करून तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाईसाठी कोकण आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या घोटाळ्यात काही कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. याची चौकशी जिल्हा परिषद पातळीवर सुरू असली तरी यात निःपक्षपाती चौकशी होणे गरजेचे आहे. तरच सत्य समोर येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..