You are currently viewing शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन..

शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन..

वेंगुर्ला /-


शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने महिला दिनानिमित्त शुक्रवार दि.११ मार्च रोजी सायंकाळी ४ वा.ग्रामपंचायत हॉल शिरोडा येथे पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी मार्गदर्शन करणार असून परीक्षक म्हणून प्रसिद्ध उद्योजिका व व्यवसाय प्रशिक्षिका प्राची धुरी उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धेसाठी पदार्थ : शाकाहारी केक बनविणे ( घरी बनवून आणणे), विषय/थीम : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून जागतिक पर्यटन नकाशावर, केक वजन कमीत कमी १ kg किंवा त्या पुढील, केक बनवत असताना सुरुवातीच्या कृतीचा व नंतरच्या डिझाइन करतानाचा असा १० ते १५ मिनिटांचा मोबाईलवर व्हिडीओ काढून आणावा,१ किंवा जास्तीत जास्त २ महिला मिळून १ केक बनवू शकतात, विषया प्रमाणे पदार्थ मांडणी असावी. कृती सांगता आली पाहिजे, नाव नोंदणी करताना सर्व अटी व नियम समजून घेण्याची जबाबदारी स्पर्धकांची राहील व परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.विजेत्या प्रथम क्रमांक २ हजार रुपयेची आकर्षक भेटवस्तू, द्वितीय क्रमांक १५०० रुपयेची आकर्षक भेटवस्तू,तृतीय क्रमांक १ हजार रुपयेची आकर्षक भेटवस्तू,
उत्तेजनार्थ ५०० रुपयेची आकर्षक भेटवस्तू अशी पारितोषिके असून सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.ही स्पर्धा निःशुल्क व शिरोडा मर्यादित खुल्या गटासाठी असून नाव नोंदणी अंतिम तारीख ९ मार्च असून
अधिक माहितीसाठी शिरोडा ग्रामपंचायत कार्यालय येथे संपर्क साधावा,असे आवाहन सरपंच मनोज उगवेकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..