You are currently viewing वरची कुंभारवाडी येथील विहीर नूतनीकरणाच्या कामाचा भाजपच्यावतीने करण्यात आला शुभारंभ.;माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या कार्यकाळात मंजूर झाली होती विहीर

वरची कुंभारवाडी येथील विहीर नूतनीकरणाच्या कामाचा भाजपच्यावतीने करण्यात आला शुभारंभ.;माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या कार्यकाळात मंजूर झाली होती विहीर

कुडाळ /-

शहरातील वरची कुंभारवाडी येथे कुडाळ नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विहीर नुतनीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक दशरथ कुंभार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

कुडाळ शहरातील वरची कुंभार वाडी येथील एमआयडीसी विश्रामगृह जवळ असलेल्या विहिरीचे नूतनीकरण होणे गरजेचे होते यासाठी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी प्रयत्न केले तसेच त्यावेळच्या सत्ताधारी नगरसेवकांनी हे काम मंजूर करण्यासाठी सहकार्य केले. प्रभागातील भाजप पदाधिकारी बाळा कुंभार, गुरु कुंभार यांनी हे काम व्हावे म्हणून सातत्याने पाठपुरावा केला हे काम मंजूर झाल्यावर या नुतनीकरण कामाचा शुभारंभ वरची कुंभारवाडी येथील जेष्ठ नागरिक दशरथ कुंभार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी भाजपा गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, निलेश परब, एड. राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, माजी नगरसेविका प्रज्ञा राणे, माजी नगरसेवक गणेश भोगटे, उपाध्यक्ष बाळा कुंभार, बुथ अध्यक्ष गुरु कुंभार, ममता कुंभार, महेश कुंभार, जयेंद्र कुंभार, अनिल कुंभार तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..