कणकवली /-

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष सावंत, सेक्रेटरी पदी चंद्रशेखर लिंग्रस तर खजिनदार पदी आनंद मर्ये यांची निवड करण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत पॅनेलने भाजपा पुरस्कृत पॅनलचा पराभव केला होता. शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या विजयाचे किंग मेकर उद्योगपती संजय आग्रे ठरले होते. तर आज झालेल्या पदाधिकारी निवडीत चेअरमन पदी सुभाष सावंत, सेक्रेटरी पदी चंद्रशेखर लिंग्रस तर खजिनदारपदी आनंद मर्ये यांची निवड करण्यात आली.

नूतन पदाधिकाऱ्यांचे उद्योगपती तथा संचालक संजय आग्रे यांनी अभिनंदन केले. यावेळी संदेश पटेल, राजन नानचे, अविनाश सापळे, बबन पवार, सचिन तायशेटे, मनीष गांधी, राजन चिके, राजू पटेल, केदार रेवडेकर, सिद्धेश राणे, संजय सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page