You are currently viewing आरवली श्री देव वेतोबा देवस्थानला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट –

आरवली श्री देव वेतोबा देवस्थानला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट –

वेंगुर्ला /


पर्यटनदृष्ट्या आरवली श्री देव वेतोबा देवस्थानचा विकास करण्यासंदर्भात केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहू,असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले.केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली श्री देव वेतोबा देवस्थानला भेट दिली.
यावेळी त्यांचे आरवली देवस्थान कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी देवस्थान समितीशी चर्चा केली. तसेच सिंधुदुर्ग पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटन विकासासंदर्भात चर्चा झाली.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेला असल्याने व आरवली श्री देव वेतोबा देवस्थान हे प्रसिध्द देवस्थान असल्याने त्यादृष्टीने येथे पर्यटन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्रशासनाच्या वतीने प्रयत्नशील राहणार,असे त्यांनी सांगितले.यानंतर त्यांनी येथील अन्नछत्र कक्षात भाविकांसमवेत येथील प्रसादाचा लाभ घेतला.यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जयवंत राय,विश्वस्त डॉ.प्रसाद साळगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा