You are currently viewing माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी स्वखर्चातून घालून दिला बंधारा..

माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी स्वखर्चातून घालून दिला बंधारा..

वेंगुर्ला / –

वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील वाॅर्ड क्रमांक १०,११,१२ एसटी बसस्थानक नजिक सुंदर भाटले कुंभवडे आणि परिसरातील नागरिकांना मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळी महिन्यात पिण्याच्या पाण्यासोबत दैनंदिन वापराच्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागू नये यासाठी वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक संदेश निकम यांनी स्वखर्चाने येथे बंधारा घालून दिला आहे.त्यांच्या या सामाजिक कार्याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.संदेश निकम हे गेली कित्येक वर्षे राजकारणाबरोबर समाजसेवा देखील करत आहेत.ऍम्ब्युलन्स सेवेच्या माध्यमातून तसेच कोरोना कालावधीत सुद्धा त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.माजी नगराध्यक्ष संदेश निकम आणि माजी नगरसेविका सुमन निकम हे स्वखर्चाने गेली अनेक वर्षे मातीचा बंधारा घालून देत आहेत आणि यावर्षी देखील त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने स्वखर्चाने बंधारा घालून दिला आहे. त्यानी घातलेल्या बंधाऱ्यामुळे परिसरातील नागरिकांना शेती, बागायतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. संदेश निकम यांनी केलेल्या या कामाबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी वेंगुर्ला शिवसेना शाखाप्रमुख राजू परुळेकर,आंबा व्यापारी छोटू वेंगुर्लेकर,अमित राऊत, उदय राऊत,नागरिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..