You are currently viewing कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वागदे येथे बांधले वनराई बंधारे.

कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वागदे येथे बांधले वनराई बंधारे.

कणकवली /-

कणकवली कॉलेज कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचेमार्फत दत्तक गाव वागदे तालुका कणकवली याठिकाणी नुकतेच विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जलसंधारणातून जल सुरक्षिततेकडे या उपक्रमांतर्गत वागदे ग्रामपंचायत हद्दी मध्ये गावठाणवाडी, दंगलवाडी, ग्रामपंचायत व गणेश मंदिर या ठिकाणी गड नदी वरती एकूण सहा वसुंधरा बंधारे बांधण्यात आले.

या जलसंधारण कार्यक्रमास वागदे ग्रामपंचायत सरपंच सौ. पूजा घाडीगावकर उपसरपंच रुपेश आमडोसकर, ललित घाडीगावकर, ग्रामसेवक प्रशांत वर्दम व वागदे ग्रामस्थ यांनी आवश्यक साहित्य देऊन सहकार्य केले. या शिबिरामध्ये करण्यात आलेल्या श्रमदाना मध्ये 130 विद्यार्थी सहभागी झाले. याव्यतिरिक्त श्रमदान कार्यक्रमात वागदे स्मशानभूमी, शाळा नंबर 1, शाळा नंबर 2 याठिकाणी स्वच्छता करण्यात आली. तसेच वागदे ते कासरल या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. शिबिराचे आयोजन प्रा. सुरेश पाटील प्रा. सागर गावडे प्रा. विनया रासम प्रा. आदिती मालपेकर व प्रा. प्रवीण कडुकर यांनी प्राचार्य डॉ राजेंद्र कुमार चौगुले आणि सर्व पदाधिकारी शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा