ओरोस /-

भारतीय बौध्द महासभा सिंधुदुर्गच्यावतीने रविवार दि. ६ मार्च, २०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ४.०० या वेळेत सिंधुदुर्गातील बौद्ध बांधवांसाठी धम्म विधीकर्ता प्रशिक्षण जि. प. आरोग्य सेवक पतपेढी हॉल, ओरोस येथे आयोजित केले असून धम्म विधी कशा प्रकारे पार पाडाव्यात, विधीमध्ये एकसूत्रता यावी याविषयीचे मार्गदर्शन तज्ज्ञांच्यावतीने करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण शुल्क रु. २००/- असून त्यामध्ये नाष्टा, जेवण, उपस्थिती प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी सफेद कपडे परिधान करणे गरजेचे आहे. तसेच कोविड – १९ च्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तरी इच्छूक बौद्ध बांधवांनी शुक्रवार दि. ४ मार्च, २०२२ पर्यंत जिल्हा संस्कार प्रमुख सिताराम सोनवडेकर – ९४०४४३९५७९, महासचिव अशोक कांबळे – ९४२१०३८८१५ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page