देवगड /-

पर्यटन संचलनालय कोकण‍ विभाग नवी मुंबई आयोजित पाच दिवशीय टुरिस्ट गाईड ट्रेनिंग मुरबाड येथे यशस्वीरित्या आयोजन करुन पार पाडण्यात आले. यावेळी अनेक विदयार्थ्यांनी पर्यटनाविषयक प्रशिक्षण घेतले आहे.

पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून कोकणामध्ये विकास करण्याचे ध्येय पर्यटन संचालनालय कोकण विभागाने ठरविले असून गोव्यापेक्षा देखील कोकणामध्ये निसर्ग सौदर्य पर्यटन स्थळे आहेत. यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी खुणवत आहे. मात्र प्रशिक्षणा अभावी व मार्गदर्शनामुळे कोकणातील विदयार्थी पर्यटनाच्या दृष्टीकोनातून मागे राहता कामा नये यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई या जिल्हयामधील 21 फेब्रुवारी ते 1 एप्रिल या कालावधीमध्ये पर्यटन संचलनालय कोकण विभाग नवी मुंबईने पर्यटन प्रशिक्षण मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे. याची सुरुवात 21 फेब्रुवारी रोजी मुरबाड येथे करण्यात आली.

ही टुरिस्ट गाईड ट्रेनिंग आय. आय. टी. टी. एम. ग्वाल्हेर, यांचे फॅकल्टी डॉ. रमेश देव्रथ यांनी मुलांना पाच दिवशी गाईड ट्रेनिंग दिली. या गाईड ट्रेनिंग मध्ये मुरबाड परिसरातील 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. पाचव्या दिवशी प्रशिक्षणात प्रत्यक्ष गाईड म्हणून कसे काम करायचे याचा प्रत्यक्ष अनुभव एक दिवशीय सहल आयोजित करून पर्यटन स्थळाला प्रत्यक्ष भेट देवून ट्रेनिंग त्याठिकाणी देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी गाईड ट्रेनिंग पूर्ण केल्यामुळे राम दुधाले, नगराध्यक्ष मुरबाड नगरपंचायत ,हनुमंत हेडे उपसंचालक पर्यटन कोकण विभाग नवी मुंबई, डॉ. रमेश देवरथ ,आय. आय. टी. टी. एम. आणि दिवाकर शेट्टी, संचालक हॉटेल सारिका मुरबाड या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

कोकणामधील बेरोजगारांना पर्यटनाच्या दृष्टीकोनातून एक मोठी रोजगारांची संधी आहे. कोकणामधील पर्यटकांचा लोंढा वाढत आहे. यामुळे पर्यटन उदयोग धंदयांना वाव मिळण्याची एक मोठी संधी आहे. यामुळे स्थानिक रोजगारांनी पुढे येवून पर्यटन व्यवसाय केला पाहिजे. यासाठी कोकण पर्यटन संचलनालयातर्फे नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जात आहेत. या मार्गदर्शन शिबिरांचा जास्तीत जास्त विदयार्थी व बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही कोकण पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page