You are currently viewing पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात “मराठी राजभाषा गौरव दिन साजरा.

पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात “मराठी राजभाषा गौरव दिन साजरा.

देवगड /-

ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये झाला. कवितेमध्ये रमताना कुसुमाग्रजांनी कविता कादंबरी नाटक ललित वांड:मयातही मुक्त विहार केला. नटसम्राट या महानाट्य कृतीसाठी कुसुमाग्रज यांना साहित्य एकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. काल दिनांक 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन मंदिर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस त्याचे औचित्य साधून आज दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी पुंडलिक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महाविद्यालय शिरगाव मध्ये मराठी राज्य भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.त्याच बरोबर महाविद्यालयात online पद्धतीने मराठी भाषा सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा व पाककला आणी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक ध्वजेंद्र मिराशी सर.शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी साटम सर. महाविद्यालयाचे शिक्षकवृंद आणी विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा