कुडाळ/-

बाल महोत्सव मधील विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.पाच वर्षे ते सोळा वर्षे वयोगटातील तब्बल 325 विद्यार्थ्यांनी सहभाग यात घेतला. बॅरिस्टर नाथ पै. विद्यालयाच्या भव्य प्रशाला परिसरात महोत्सव पार पडला.हा बालमहोत्सव सकाळी दहा ते सायं.सहा वाजेपर्यंत होता.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष कुडाळ श्री मंदार शिरसाट ,बिल्डर प्रदीप माने, अॅड.आनंद गवंडे ,प्राचार्य अरुण मर्गज सर , हेमंत जाधव असे मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर एकावेळेस विविध स्पर्धांना सुरुवात झाली. विद्यार्थी मोठ्या तयारीने स्पर्धेत सहभागी झाले होते. कार्यक्रमात मोठ्या पडद्यावर महाराजांच्या गड किल्यांच्या माहीती विषय लघुपट सुरु होता. दुपारी विद्यार्थी-पालक भोजन व्यवस्था आयोजित केली होती. दुपारच्या प्रहरा नंतरच्या कार्यक्रमात अक्षर तज्ञ विकास गोवेकर सर यांचे अक्षर सुवाच्य कसे करावे याचा अभ्यास वर्ग घेण्यात आला.. विद्यार्थी पालक यांनी याचा लाभ घेतला.महत्त्वाची माहिती त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिल्या..विविध स्पर्धांचे निकाल खालीलप्रमाणे…

पाठांतर स्पर्धा (बालगट.)
प्रथम क्रमांक- कु. तेजश्री मं. राऊत .
द्वितीय क्रमांक – साईसागर रुइकर .
तृतीय क्रमांक –
कु.भाविक ग. मेस्त्री.
उत्तेजनार्थ – कु.विजय बांदिवडेकर.

वकृत्व स्पर्धा (बाल गट)
प्रथम क्रमांक- कु.रामचंद्र अ. खवणेकर.
द्वितीय क्रमांक- कु. मीरा म. सामंत .
तृतीय क्रमांक – कु शरण्या बाबाजी भोई
उत्तेजनार्थ- कु.यज्ञेश यु. शिंदे.

वकृत्व स्पर्धा (किशोर गट)
प्रथम क्रमांक- कु. श्रावणी रा. आरोंदेकर.
द्वितीय क्रमांक- वरद सं. प्रभू.
तृतीय क्रमांक -आलिशा अनिल पाटकर.
उत्तेजनार्थ- प्रज्योत पं. पार्सेकर.

चित्रकला स्पर्धा (बालगट)
प्रथम क्रमांक- ओम कि. चव्हाण द्वितीय क्रमांक- वेदिका गं. मोर्ये.
तृतीय क्रमांक- कादंबरी रजनीकांत कदम.
उत्तेजनार्थ- शमिका सचिन चिपकर

चित्रकला स्पर्धा (किशोर गट) प्रथम क्रमांक- पूर्वा रा. चांदुरकर.
द्वितीय क्रमांक -रिचा कि. चव्हाण.
तृतीय क्रमांक- तन्वी प्र. लुडबे.
उत्तेजनार्थ- पलाशा प्रदीप माने.

किलबिल डान्स अॅकॅडमीचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी महोत्सवाला बहार आणली.. या महोत्सवादरम्यान विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण प्रसंगी अॅड. सुहास सावंत, गुरुदास गवंडे मनसे तालुकाध्यक्ष सावंतवाडी, सुधीर राऊळ,गौरव मोडाक, अमित कुराडे, शशांक पिंगुळकर, अध्यक्ष सचिन गुंड, कार्याध्यक्ष सुशांत परब, सौ.वर्धा गवंडे हे मान्यवर लाभले.. मान्यावरांनी आपले मनोगत मांडले धीरज परब यांनी बॅ.नाथ पै .शिक्षण भवनाचे चेअरमन श्री.उमेश गाळवणकर यांचे आभार मानले. महोत्सव यशस्वी करण्याकरिता दिलीप तांबे ,राजू माने ,सिद्धेश परब, विनित परब, सुबोध परब, जगन्नाथ गावडे, समीर नाईक, सागर सावंत ,हर्ष पालव,रामचंद्र आंबेरकर, प्रथमेश धुरी ,चेतन राऊळ, भूषण राणे यांनी मेहनत घेतली व उत्कृष्ट आयोजन केले… सूत्रसंचालन बाबाजी भोई यांनी केले.. दरम्यान पालकांनी या महोत्सवाच्या कल्पनेचे कौतुक केले उत्कृष्ट नियोजन आयोजन झाले अशी प्रतिक्रिया दिली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page