You are currently viewing रांगणा गडावरील हत्तीची सोंड बुरुजावर भगवा झेंडा फडकला..

रांगणा गडावरील हत्तीची सोंड बुरुजावर भगवा झेंडा फडकला..

कुडाळ /-

आमच्या दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागचे मार्गदर्शक अँड किशोरजी शिरोडकर यांची गेल्या दोन – तीन वर्षांपासून आपल्या महादेवाचे केरवडे गावाच्या सीमेवर असलेल्या रांगणा गडावरील सोंडेचा बुरुज म्हणजेच हत्तीची सोंडच्या टोकावर भगवा झेंडा लावण्याची ईच्छा काल मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी पूर्ण केली.या मोहिमेसाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाचे अध्यक्ष गणेश नाईक, विशाल परब, किरण सावंत व चंद्रकांत पवार हे उपस्थित होते. सकाळी यशवंत दरवाजामार्गे साहित्य नेऊन भगवा झेंडा लावण्यात आला. झेंडा लावण्यासाठी लागणाऱ्या पाईपसाठी अँड किशोरजी शिरोडकर यांनी मदत केली, वाळू व सिमेंट साठी दत्ताराम गोविंद परब यांनी मदत केली, झेंडा पुळास येथील सावंत यांनी शिवून दिला सर्वांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने आभार.

अभिप्राय द्या..