You are currently viewing नांदगाव येथे त्वचारोग ,गुप्तरोग,कुष्ठरोग रुवनांची १मार्चला मोफत तपासणी.

नांदगाव येथे त्वचारोग ,गुप्तरोग,कुष्ठरोग रुवनांची १मार्चला मोफत तपासणी.

कणकवली /-

राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन माळेगांव व कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त महाशिवरात्री निमित्त मोफत त्वचा, कुष्ठरोग व गुप्तरोग तपासणी शबिराचे आयोजन मंगळवार दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळी करण्यात आले आहे. सदर शिबिर हे भगवती मेडिकल, नांदगाव तिठा येथे होणार आहे मागील 26 जानेवारी रोजी सदर शिबिर झाले होते.त्यावेळीही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. व रुग्णांनी औषध उपचार सुरू केले होते

याचा अनुभव चांगला आल्याने रुग्णांच्या मागणी नुसार पुन्हा एकदा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात रुग्णांची तपासणी मोफत होणार असून औषधे मेडीसिन हे प्रत्येक रुग्णाला गरजेनुसार घ्यावी लागेल.

सदर शिबिरासाठी डॉ. शिशिर खोसे पाटील हे तज्ञ डॉ लाभणार आहेत. सदर डॉ हे ससून हॉस्पिटल पुणे येथून एम डी पदवी प्राप्त असून केंद्र शासनाची DNB त्वचारोग तज्ज्ञ पदवी पूर्ण झालेली आहे. तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे व किशोर मोरजकर ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..