ओरोस /-

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या माध्यमातुन जिल्ह्यातील एकुण 5941 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्राचे 23 फेब्रुवारी रोजी 3705 महिलाच्या माध्यमातुन एफटिके किटच्या सहाय्याने पाण्याची तपासणी करण्यात आली.  अशी माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पातर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनत़ेला शुध्द व सुरक्षित पाणी उपलब्ध करून  देणे हे शासनाचे प्रमुख उदिष्ट आहे. यासाठी पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीसाठी क्षेत्रीय तपासणी संचाच्या (फिल्ड टेस्ट किटच्या) माध्यमातून स्थानिक लोकांना सक्षम करण्यात येत आहे. याकरीता प्रती महसुल गावात पाच  महिलांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत स्‍तरावर गावनिहाय पाणी गुणवत्‍ता तपासणीकरिता महसुल गाव निहाय पाच महिलांना जैविक फिल्ड टेस्ट किट H2S व्हायलसबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षित महिलाच्या माध्यमातुन दिनांक २३ फेब्रुवारी 2022 रोजी एकाच दिवशी अभियान स्वरुपात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ५९४१ सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे जैविक FTK- H2S व्हायलस (बाटली) वापरुन तपासणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात जलजन्य आजार होऊ नयेत. तसेच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता उच्च प्रतिची राखली जावी तसेच पाणी गुणवत्ता कार्यक्रम महिलांना आपलासा वाटावा हा हेतु शासनाचा आहे. या करीता जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान मोडवर या कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील सर्व ग्रामपचायतीनी सहभाग घेत जिल्ह्यातील सर्व  सार्वजिक पिण्याच्या पाण्याच्या सोर्स चे जैविक फिल्ड टेस्ट किट H2S च्या माध्यमातुन परिक्षण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page