You are currently viewing नरडवे येथील मंदिरांत जातीभेदाचे प्रकार; चर्मकार बांधवांना वेगळी वागणूक.

नरडवे येथील मंदिरांत जातीभेदाचे प्रकार; चर्मकार बांधवांना वेगळी वागणूक.

कणकवली /-

नरडवे येथील आई अंबादेवी आणि आई विठ्ठलादेवी या मंदिरात हिंदू असूनही चर्मकार लोकांना वेगळी वागणूक दिली जात असून जातीभेदाचा प्रकार घडत आहे. तरी हे प्रकार थांबवावे, असे निवेदन नरडवे पायरवाडी मधील रहिवाशांनी सरपंच नरडवे ग्रामपंचायत यांना दिले आहे. हे निवेदन सुभाष पवार यांच्या हस्ते सरपंचांना सुपूर्द करण्यात आहे. तसेच डॉ. सतीश पवार यांनी व्हाट्सएपवरून पाठवले आहे. सदर बाबतीत सरपंच यांनी तोंडी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी यांच्या लेखी उत्तराची प्रतीक्षा असून त्यानंतर गरज पडली तर पुढील ठिकाणी दाद मागली जाईल, असे नरडवे पायरवाडी येथील रहिवासी सांगत आहेत. या निवेदनावर चाळीस लोकांनी सह्या केल्या आहेत.

अभिप्राय द्या..