विशाखा पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी प्रा. मोहन कुंभार कविसंमेलनाचे अध्यक्ष

कणकवली /-

सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान तर्फे मंगळवार दिनांक 1 मार्च रोजी सायं. 4.30 वाजता मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे आयोजित सरस्वती लक्ष्मण पवार पहिल्या राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे औचित्य साधून खुल्या कवीसम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गातील कवींना स्वरचित कविता वाचनाची संधी या कवी सम्मेलनात मिळणार आहे. कवी संमेलनात सहभागी होण्यासाठी खालील मोबाईल नं. वर आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या सचिव शुभांगी पवार यांनी केले आहे.
सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पहील्याच राज्यस्तरीय काव्यपुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख यांच्या कुरूप या काव्यसंग्रहाची निवड झाली आहे. ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’ कार लक्ष्मण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सत्रात या पुरस्काराचे वितरण होईल आणि दुसऱ्या सत्रात विशाखा पुरस्कार प्राप्त नामवंत कवी प्रा. मोहन कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली खुले कविसम्मेलन संपन्न होईल.
प्रा. मोहन कुंभार यांचा ‘जगण्याच्या गाथा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित असून अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या कविसम्मेलनात त्यांनी निमंत्रित कवी म्हणून काव्य वाचन केले आहे. अखिल भारतीय गोमंतक युवा साहित्य सम्मेलन तसेच दुसऱ्या नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान त्यांनी भूषविले आहे. मराठीतील नामवन्त, दर्जेदार नियतकालिकांमध्ये सातत्याने त्यांच्या कवितांना स्थान मिळाले आहे. अण्णाभाऊ साठे आदर्श साहित्यिक पुरस्कार, यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांसोबतच मराठी साहित्यातील मानाच्या ‘विशाखा पुरस्कारा’ ने सुद्धा ते सन्मानित आहेत. तसेच मुंबई विद्यापीठाच्या बीए प्रथम वर्ष अभ्यासक्रमात कवितेचा समावेश झालेला आहे.
तरी, साहित्य-काव्य रसिकांनी या सम्मेलनात आवर्जून उपस्थित रहावे आणि ज्या कवींना आपली कविता या काव्यसम्मेलनात सादर करावयाची आहे त्या कवींनी पुढील मोबाईल नंबरवर आपली नाव नोंदणी करावी-
संपर्क सुरेश पवार – 9422633118
मीनाक्षी चव्हाण – 8805645382

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page