You are currently viewing संजय पडतेंची नेमकी भूमिका काय ? तुमच्यासाठी कुडाळ गटविकास अधिकारी अभिनंदनास पात्र कधी झाले ? कुडाळ सभापती सौ.नूतन आईर यांचा प्रश्न.

संजय पडतेंची नेमकी भूमिका काय ? तुमच्यासाठी कुडाळ गटविकास अधिकारी अभिनंदनास पात्र कधी झाले ? कुडाळ सभापती सौ.नूतन आईर यांचा प्रश्न.

कुडाळ /-

कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या भ्रष्ट कारभाराची एक महिन्यापूर्वी चौकशीची मागणी करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते हे जिल्हा परिषदेच्या अचानक स्थायी समितीच्या सभेमध्ये संजय पडते कुडाळ प.स. गटविकास अधिकारी यांच्या अभिनंदनाची मागणी करू लागले आहेत, यामागे पडद्यामागील रहस्य काय आहे ” हे कुडाळ तालुक्यातील जनतेची उत्कंठा शिगेला” पोहचली आहे.

दिनांक १८/०२/२०२२ रोजी रोजी झालेल्या जि.प स्थायी समिती मध्ये कुडाळ गटविकास अधिकारी यांची बदनामी होत असेल असे जर त्यांचे म्हणणे असेल तर,तत्कालीन गटविकास अधिकारी एन.व्ही.नाईक यांचे कार्यकाळातील सन २०१६ /१७ मध्ये व त्यानंतर सन २०१७/१८ मध्ये मिळालेल्या बक्षीस रकमेतील (55 ℅ ) टक्के निधीची कशी माती केली आहे.हे संजय पडते यांनी प्रथम डोळ्यावरील पट्टी बाजूला करून पंचायत समिती मध्ये येऊन पाहणी करावी त्यानंतरच त्यांना गटविकास अधिकारी यांचा अभिनंदनाचा ठराव घ्यावा की निषेधाचा ठराव घ्यावा हे समजेल.आता तर उघड होत आहे की संजय पडते जि.प सदस्य आहेत आणि शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेत गटविकास अधिकारी यांचे समर्थन हे त्यांचे वैयक्तिक मत आहे का ? की, शिवसेना पक्षाचे मत आहे ? हे प्रथम त्यांनी जाहीर करावे.भ्रष्ट अधिकाऱ्यांना समर्थन कोण करते हे हळूहळू जनतेसमोर येऊ लागले आहे.

मी सभापती सभापती असले तरी संजय पडते यांच्यावर बोलणे इतपत मी मोठी नाही परंतु नाविलाजाने मला याचे उत्तर द्यावे लागत आहे.केवळ बंधारे याचाच विषय स्थायी समिती काडला जातो अन्य विषयावर पण चौकशीची मागणी का ? करत नाही १ महिन्यापूर्वी ग.वि.अ.यांच्या चौकशी मागणी केल्यानंतर असा कोणता चमत्कार झाला की , त्यांच्यावर गटविकास अधिकारी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची वेळ आली.मी उघड केलेला भ्रष्टाचार १००℅ टक्के खरे असून त्यात तत्थ नसेल तर मी राजकिय संन्यास घेईन परंतु जर केलेले आरोप खरे असतील तर संजय पडते यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा कोणतीही खातरजमा न करता एका भ्रष्ट अधिकाऱ्याची तळी उचलणे व आरोप करणाऱ्याला चुकीचे ठरवीने म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असे म्हणावे लागेल.

जिल्हा परिषदेच्या कारभारावर तुटून पडणारे संजय पडते कुडाळ पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर डोळे मिटून गप्प का आहेत ? त्यामुळे कुडाळ तालुक्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.अशा या समर्थनामुळे राजकीय नेत्यांनवरील लोकांचा असलेला विश्वास नक्कीच उडणार आहे.तरी माझे सभापती म्हणून असे आवाहन आहे की,पडते यांनी कुडाळ पंचायत समितीमध्ये यावे व आरोप केलेल्या सर्व प्रकरणांची प्रत्यक्ष पाहणी करावी, म्हणजे खरे काय आणि खोटे काय हे समजेल.असे कुडाळ पंचायत समितीच्या सभापती सौ.नूतन नागेश आईर यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिप्राय द्या..