You are currently viewing मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर उद्या शिवजयंती

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर उद्या शिवजयंती

मालवण /-

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उद्या १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९ वाजता उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मूर्तीस जिरेटोप अर्पण करण्यात येणार आहे. तरी सकाळी ०८:३० वाजता मालवण जेटी येथे शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी , शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे , युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा