You are currently viewing कुडाळ शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार.;अभय शिरसाट.

कुडाळ शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार.;अभय शिरसाट.

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची ताकत आणि हिंमत देणारे विनायकराव देशमुख प्रभारी सिंधुदुर्ग राष्ट्रीय काँग्रेस यांच्या मुळे आम्ही स्वबळावर लढू शकलो आणि कार्यकर्त्यांचे बळ निर्माण करण्यात काम केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो.तसेच निवडणूक मोजणी झाल्यानंतर उमेदवारांना सुरक्षित स्थळी आपल्या घरातील असणाऱ्या माणसांप्रमाणे आमची सोय करणारे सचिन जी चव्हाण शहराध्यक्ष कोल्हापूर काँग्रेस तसेच गुलाबराव घोरपडे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस या दोघांचेही खास आभार व्यक्त केले.


तसेच कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष महाविकासआघाडीचा बसण्यासाठी आमदार सतेज पाटील संपर्कमंत्री राष्ट्रीय काँग्रेस सिंधुदुर्ग माननीय आमदार वैभव जी नाईक खासदार विनायक जी राऊत आमदार उदय सामंत यांनी खास प्रयत्न केले.कुडाळ शहर विकास करत असताना शहराचा सर्वांगीण विकास ज्यामध्ये कुडाळ नगरपंचायत ची सुसज्ज इमारत भाजी मार्केट शॉपिंग कॉम्प्लेस मच्छी मार्केट भुयारी गटार जॉगिंग ट्रॅक योगा सेंटर नगरपंचायत चे गार्डन व मैदान यासाठी महा विकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून शहर आता परिपूर्ण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असे अभय शिरसाट यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..