You are currently viewing वरवडे सोसायटी चेअरमनपदी सुरेश सादये, व्हाईस चेअरमनपदी इरफान खोत यांची निवड

वरवडे सोसायटी चेअरमनपदी सुरेश सादये, व्हाईस चेअरमनपदी इरफान खोत यांची निवड

कणकवली/-

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या गावच्या वरवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या चेअरमनपदी सुरेश सादये, व्हाईस चेअरमनपदी इरफान गफूर खोत यांची आज निवड करण्यात आली.भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, पं स चे माजी उपसभापती तथा भाजपा तालुका सरचिटणीस महेश गुरव यांनी चेअरमन सुरेश सादये, व्हाईस चेअरमन इरफान खोत यांच्यासह नूतन संचालकांचा पुष्पहार घालून सत्कार केला.यावेळी नूतन संचालन हनुमंत बोन्द्रे, दाजी सावंत, पद्माकर देसाई, रुपाली बोन्द्रे, राजकुमार बोन्द्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. वरवडे सोसायटी वर सोनू सावंत गटाचा वरचष्मा राहिला आहे. तालुक्यात अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या वरवडे सोसायटी निवडणूकीत गावातील माजी पं स सभापती प्रकाश सावंत विरुद्ध भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत या भाजपाच्याच दोन गटांत ही निवडणूक झाली होती.13 पैकी 7 जागांवर सोनू सावंत गटाचे संचालक निवडून आले होते. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. अखेर आज झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी सोनू सावंत गटाच्या संचालकांची निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच भाई बोन्द्रे, अमोल बोन्द्रे, पोलीस पाटील प्रदिप सावंत, जासिंत लोबो, मधुकर परब, विजय कोदे, हनिफ खोत, प्रमोद गावडे, विजय कदम, प्रदीप घाडीगांवकर, हसन खोत, फॉकी लोबो, सचिन घाडी, केतन घाडी, सुनील सादये,विजय सावंत, सादिक कुडाळकर, आजीम कुडाळकर, पंढरीनाथ सादये, रुपेश बोन्द्रे, विजय सावंत, सागर बोन्द्रे, राहुल बोन्द्रे, सखाराम सावंत, अनिकेत घाडी, सुधाकर घाडी, सागर लाड, राजू कोदे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..