You are currently viewing आ.नितेश राणेंची प्रकृती बिघडली असताना कार्यकर्त्यांनी फटाके वाजविणे चुकीचे.;आ.दीपक केसरकर.

आ.नितेश राणेंची प्रकृती बिघडली असताना कार्यकर्त्यांनी फटाके वाजविणे चुकीचे.;आ.दीपक केसरकर.

सावंतवाडी /-

आमदार नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असताना, कार्यकर्ते जर फटाके वाजवून जामीन मिळाल्याचा आनंद साजरा करत असतील तर ते चुकीचे आहे. असा मिश्किल टोला आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने न्यायालयीन कोठडीत जाताना छातीत दुखणाऱ्यासाठी वेगळा वॉर्ड तयार करावा. जेणेकरून सगळेच आरोप न्यायालयीन कोठडीत जाण्याऐवजी हॉस्पिटल मध्ये जातील. असे देखील ते यावेळी म्हणाले. आज अनेक जण महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली असे आरोप करत आहेत.परंतु, जर ते निर्दोष असते तर न्यायलयाने त्यांना यापूर्वीच जामीन दिला असता. त्यांची तब्बेत बिघडल्यावर देखील त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवले असते. परंतु, त्याची तब्बेत बिघडल्यावर त्यांना तातडीने उपचार करण्यासाठी रुग्णालयात दखल करण्यात आले. यावरून महाराष्ट्र सरकार सूडबुद्धीने काही करत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांना दोन वेळा न्यायालयीन कोठडी झाली आहे. त्यातून त्यांनी बोध घेऊन आता तरी सुधारावे. त्यांनी आपल्यात बद्दल करावा. असे मत देखील व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा