You are currently viewing नितेश राणे निर्दोष असते तर जेलची हवा खावी लागली नसती- आ.वैभव नाईक.

नितेश राणे निर्दोष असते तर जेलची हवा खावी लागली नसती- आ.वैभव नाईक.

सिंधुदुर्ग /-

आ.नितेश राणेंना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी नितेश राणे संतोष परब हल्ल्यातील प्रमुख संशयित आरोपी असल्यानेच त्यांना पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी झाली. त्यांचा गुन्ह्यात सहभाग नसता ते निर्दोष असते तर जेलची हवा त्यांना खावी लागली नसती.न्यायालयाने जामीन मंजूर करताना या प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत नीतेश राणेंना कणकवलीत येण्यास बंदीची अट घातली आहे. मात्र जामीनाचा आनंदोत्सव साजरा करून भाजप पक्ष नीतेश राणेंनी केलेल्या गुन्ह्याचे समर्थन करत आहे. त्यामुळे राणे समर्थकांना अशाच प्रकारचे गुन्हे घडवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत माजवायची आहे हे स्पष्ट होते. मात्र जिल्ह्यातील जनता या दहशतीला थारा देणार नाही.

अभिप्राय द्या..