वेंगुर्ला /- अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रविण आष्टीकर यांचेवर कर्तव्य बजावत असताना दि. ९.२.२०२२ रोजी झालेल्या भ्याड प्राणघातक हल्ल्याचा वेंगुर्ले नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाहीर निषेध करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटना, मुंबई यांनी आज पुकारलेल्या लेखणी बंद आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी
अत्यावश्यक सेवा वगळता काम बंद ठेवण्यात आले आहे.
या आंदोलनात प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल,निशा आळवे, लेखापाल आनंद परब, वैभव म्हाकवेकर, पंकज केळुसकर, अभिजीत गिरप, स्वप्नील कोरगावकर, सचिन काकड, स्नेहा कुबल, पल्लवी धुरी, ज्योत्स्ना रेडकर, सुधाकर राऊळ, अनुप्रिया गावडे, श्रीनिवास बोवलेकर, मंदार चौकेकर, विठ्ठल सोकटे आदी सहभागी झाले आहेत.