कुडाळ /-
कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नार्वेकर बेकरी ते महालक्ष्मी हॉल रस्ता मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरण करणे व दुतर्फा बंदीस्त गटार बांधणे, जिजामाता चौक ते राकेश पडते पान स्टॉल पर्यंत रस्ता मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरण करणे व दुतर्फका बंदीस्त गटार बांधणे. ही कामे जिल्हा वार्षिक योजना सन. 2018-19 मधील महाराष्ट्र नगरोस्थान महाअभियान या योजनेअंतर्गत 20/02/2019 च्या प्रशासकीय मान्यता आदेशाद्वारे मंजूर झालेली आहेत. या कामासाठी अनुक्रमे 55 लक्ष 89 हजार 175 व 25 लाख 47 हजार 212 इतका निधी मंजूर असुन निविदा प्रक्रीया पुर्ण होउन, दि.08/03/2019 रोजी कामाचा आदेश देण्यात आलेला आहे.
तसेच गांधीचौक ते एस. टी. डेपो रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे हे काम जिल्हा वार्षिक योजना सन. 2019-20 मधील महाराष्ट्र नगरोस्थान महाअभियान या योजनेअंतर्गत 26/03/2020 च्या प्रशासकीय मान्यता आदेशाद्वारे मंजूर झालेले आहे.या कामासाठी 43 लक्ष 40 हजार इतका निधी मंजूर असुन निविदा प्रक्रीया पुर्ण होउन दि.15/09/2020 रोजी कामाचा आदेश देण्यात आलेला आहे. शासन निर्देशानुसार मान्सून कालावधीत रस्त्याचे काम करता येत नसल्याने 30 सप्टेंबर नंतर हे काम सुरु होणार आहे. दरम्यानच्या काळात नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपंचायतीने गणेशोस्तवापूर्वी तीन वेळा ह्या रस्त्यावरील खड्डे बुजविलेले आहेत. परंतु जोरदार पाऊस व प्रतिकुल भौगोलिक परिस्थितीमुळे रस्ता पुन्हा खराब झाला आहे. तसेच गुलमोहर हॉटेल ते स्मशानभूमी या पट्यात नदीचे पाणी वारंवार साचून रस्ता खराब होतो. ह्या रस्त्याचे डांबरीकरण यापूर्वी सुमारे 7-8 वर्षापूर्वी झाले होते. त्यामुळे पावसाळा संपताच शासननिर्देशानुसार काम प्राधान्याने पुण्ण करण्यात येईल. दरम्यानच्या काळात नागरिकांच्या होणा-या गैरसोयीब बद्दल कुडाळ नगरपंचायत दिलगिरी व्यक्त करत आहे.असे कुडाळ नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.