कातकरी समाजाला वेंगुर्ले तालुका शिवसेनेचे सहकार्य

कातकरी समाजाला वेंगुर्ले तालुका शिवसेनेचे सहकार्य

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला कॅम्प येथील कातकरी समाजाच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.याबाबत वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने आज बुधवारी कातकरी समाजातील पंधरा कुटुंबांना चटईवाटप करण्यात आले.यावेळी शहर प्रमुख अजित राऊळ, सचिन वालावलकर,युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, दादा सांरग,शहर समन्वयक विवेकानंद आरोलकर, शाखाप्रमुख गजानन गोलतकर, शाखाप्रमुख डेलीन डिसोझा, हेमंत मलबारी, संदीप केळजी,आंनद बटा, दिलीप राणे,राहुल नरसाळे, सुहास मेस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेना नेहमी समाजपयोगी उपक्रम राबवित असल्याचे शहरप्रमुख राऊळ यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..