कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज बुधवारी ३६ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात १८ रुग्ण तर तालुक्यात आतापर्यंत ७३५ रुग्ण सापडले आहेत.
कुडाळ तालुक्यात आज बुधवारी ३६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून कुडाळ १८, ओरोस ३, गुढीपूर २, कसाल ३, पावशी १, पिंगुळी ३, रायगांव १, आकेरी १, घावनाळे १, नेरूर तर्फ हवेली १, वेताळ बांबर्डे १, वालावल १ असे रुग्ण आढळून आले आहेत.तसेच तालुक्यात २५५ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १८९कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ६६ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली.