कुडाळ /-
उद्या गुरुवार दिनांक २४ सप्टें. २०२० पासून कुडाळ शहर बाजारपेठ पूर्ववत सुरू होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणुन गेले आठ दिवस कुडाळ शहरातील सर्व व्यापारी- ग्राहक बंधू भगिनींनी आपले सर्व व्यवसाय बंद ठेवून जनता कर्फ्यूस सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार.कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री.संजय भोगटे यांनी केले आहे.
तसेच हा जनता कर्फ्यू यशस्वी होण्यासाठी शहरातील सर्व नागरिक, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक नगरपंचायत प्रशासन, पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी, सर्व सदस्य, पंचायत समिती प्रशासन, प्रांताधिकारी व सर्व प्रशासन, तहसिलदार व प्रशासन, महसूल, पोलिस यंत्रणा, पत्रकार बंधू भगिनींचे सुद्धा जाहीर आभार.तसेच तालुक्यातील कसाल,ओरोस, पणदूर, पिंगुळी, हूमरमळा (वालावल), घावनळे, माणगाव (नाव चुकून राहिल्यास क्षमस्व) गावातील सर्व व्यापारी बंधू भगिनींचे व नागरिकांचे व कुडाळ तालुक्यातील सर्व जनतेचे सुद्धा जाहीर आभार.आज पासून सर्व जनतेने स्वतःची काळजी घेऊन व प्रशासनाचे सर्व नियम पाळून कोरोनाला हद्दपार करूया अशी शपथ सर्वानीच घेवूया उद्यापासून सर्व दुकाने पूर्ववत उघडी असली तरी सामाजिक अंतर राखून, मास्क बांधुनच खरेदी करा असे आवाहन कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री.संजय भोगटे यांनी केले आहे.